Author Topic: मनी कोंडल्या विचारांनो...  (Read 907 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
मनी कोंडल्या विचारांनो
    जिव्हेवरती येऊ नका
 नेत्रातील स्वप्नांनो
    नेत्राबाहेर जाऊ नका ।
 विचारांच्या राज्यात
    वावरतो मी आनंदात
 त्या आनंदाला पारखे
    पुन्हा मज करू नका ।
 रोज रोजच्या स्वप्नात
    असते नवनवी रंगत
 रंगत ती जीवनाची
    दूर जाऊ देऊ नका ।
भावनांना पूर येतो
   वेगळ्या विश्वात वावरतो
भावनांच्या त्या उर्मींना
   बांधतो घालू नका ।
चोरून सखी येते
   पापणीत विसावते
पापणी उघडून माझी
   झोप ही उडवू नका ।
माधुर्य स्पर्शात असते
   शब्दांत गीत असते
संगीत त्या मिलनाचे
   बेसूर ते करू नका ।। रविंद्र बेन्द्रे

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

http://www.kaviravi.com/2013/01/love-poem-audio.html
« Last Edit: February 06, 2013, 08:20:26 AM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Raju sakhare

 • Newbie
 • *
 • Posts: 23
Re: मनी कोंडल्या विचारांनो...
« Reply #1 on: February 06, 2013, 08:46:21 AM »
nice

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: मनी कोंडल्या विचारांनो...
« Reply #2 on: February 06, 2013, 10:10:20 AM »
Sadhnaji khup chan kavita ahe.