Author Topic: प्रतीक्षा.  (Read 1183 times)

Offline Shashi Dambhare

 • Newbie
 • *
 • Posts: 10
प्रतीक्षा.
« on: February 06, 2013, 01:50:03 PM »
प्रतीक्षा

मी निशिगंध खोचून ठेवलाय  फुलदाणीत,
टपोरे  गुलाब, फ्लावर-पॉट मधे
टेबल क्लॉथ बदलून टाकलाय
झटकलेत पडदे -बिडदे ........
तू येणार म्हणून
आताशा मी जिव पाखडत नसते ,
आताशा मी तुझी
वाटही  पाहत नसते .......
कारण, जेंव्हा जेंव्हा मी
निशिगंध श्वासात माळला,
आणि गुलाब ठेवले गालावर
गलिच्यासारखे अंथरले  स्वता:ला
आणि नज़र टांगली दारावर ,
तेंव्हा तेंव्हा  तू आलाच नाहीस ना ..... सख्या !

शशी .

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: प्रतीक्षा.
« Reply #1 on: February 06, 2013, 02:45:04 PM »
Shashi ji khup masta.

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: प्रतीक्षा.
« Reply #2 on: February 06, 2013, 02:54:02 PM »
वाह वाह! मस्त!

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रतीक्षा.
« Reply #3 on: February 07, 2013, 10:33:02 AM »
kya bat.... sahi