Author Topic: तुझे येणे जाणे  (Read 2166 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
तुझे येणे जाणे
« on: February 06, 2013, 02:37:43 PM »
तुझे येणे जाणे
असते जीवघेणे
जसे हाती नसते
फुलांचे फुलणे ..१
विसरलेली पुन्हा
कविता आठवणे
सावरलेले मन
होणे वेडे दिवाणे ..२
उपचार जरी ते
तुझे मोहक हसणे
घडे माझे त्यावर
पुन्हा वितळून जाणे ..३
जरी सहज असे
तुझे पाहणे बोलणे
पण माझे उगाच
नादान खुळखुळणे ..४
नको नको म्हणून
पुन्हा हवे असणे
हवे हवे असून
जीव घोर लावणे ..५
तुझे येणे जाणे ...

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


Marathi Kavita : मराठी कविता

तुझे येणे जाणे
« on: February 06, 2013, 02:37:43 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तुझे येणे जाणे
« Reply #1 on: February 06, 2013, 02:46:52 PM »
Vikrantji khup chan lihiley.

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: तुझे येणे जाणे
« Reply #2 on: February 06, 2013, 02:52:31 PM »
घडे माझे त्यावर
पुन्हा वितळून जाणे>>> आणि
हवे हवे असून
जीव घोर लावणे ..५ >>> अर्थ नाही उमगला.

पण बाकी यमक छान जमलंय.

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
Re: तुझे येणे जाणे
« Reply #3 on: February 06, 2013, 10:07:37 PM »
मधुराजी ,
उपचार जरी ते तुझे मोहक हसणे .घडे माझे त्यावर पुन्हा वितळून जाणे .   मला वाटते, घडे  म्हणजे घडणे या अर्थी आहे ,वितळणे -विरघळणे तिला पाहून मी स्वत:ला लोखंडा सारखे घट्ट केले होते ,पण तिच्या हसण्या मुळे मी वितळलो  .

हवे हवे असून जीव घोर लावणे     नको नको म्हणून पुन्हा हवे असणे   या ओळी एकाच वेळी प्रियेला पाहून वाटणाऱ्या परस्पर विरोधी भावना व्यक्त करतात .ती हवी पण ती जीवाला घोर लावते म्हणून नको .खर तर ती एक तक्रार आहे  .

धन्यवाद .

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: तुझे येणे जाणे
« Reply #4 on: February 07, 2013, 10:28:17 AM »
Ok, nice.

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुझे येणे जाणे
« Reply #5 on: February 07, 2013, 10:35:08 AM »
chan kavita

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
Re: तुझे येणे जाणे
« Reply #6 on: February 07, 2013, 12:45:07 PM »
thnaks kedar,madhura

JYOTIKA

 • Guest
Re: तुझे येणे जाणे
« Reply #7 on: February 09, 2013, 06:14:52 PM »
Nice

Offline bhanudas waskar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 181
Re: तुझे येणे जाणे
« Reply #8 on: February 22, 2013, 12:38:23 PM »
nice poem

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
Re: तुझे येणे जाणे
« Reply #9 on: February 22, 2013, 05:06:26 PM »
धन्यवाद भानुदासजी आणि ज्योतिकाजी

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):