Author Topic: आठवुनी तुज ...  (Read 1324 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
आठवुनी तुज ...
« on: February 08, 2013, 08:00:01 AM »
आठवुनी तुज सहवासाला
   दुःखात मी गुंगलो
भयाण वाटे एकट्याला 
   जरी आठवणीत रंगलो ।   
आठवणी घोंगावताती 
   सुख दु:खाने भरलेल्या
अन येती तशा मनांत 
   सहवासातील बहकलेल्या ।
विचित्र गूढ़ जीवनाचे 
   मजला नच उलगडते
सांशक मन भीतीनेच 
   कां सदा भरुनी जाते ।
लागते न मन कुठेही 
   जीवनांस ना वाटे अर्थ
का जगावे फुका वाटते 
   असतां जीवन सारे व्यर्थ ।
लागली फ़क्त ओढ़ आतां 
   तुलाच पुन्हां भेटण्याची
वेळ केव्हां येणार ती?
   वाट पहात आहे त्याची ।। रविंद्र बेन्द्रे

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

http://www.kaviravi.com/2013/01/love-poem_30.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: आठवुनी तुज ...
« Reply #1 on: February 08, 2013, 11:28:05 AM »
Sadhnaji khup chan kavita ahe.
लागते न मन कुठेही
   जीवनांस ना वाटे अर्थ
का जगावे फुका वाटते
   असतां जीवन सारे व्यर्थ ।
लागली फ़क्त ओढ़ आतां
   तुलाच पुन्हां भेटण्याची
वेळ केव्हां येणार ती?
   वाट पहात आहे त्याची ।।

... Khup chan...