Author Topic: माझे मलाच समजले नाही  (Read 1712 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
माझे मलाच समजले नाही
« on: February 10, 2013, 04:48:21 PM »
माझे मलाच समजले नाही

गेल्या last week पासून माझे मलाच ठाऊक नाही 
कसे आलो तुझ्या जवळ मला समजलेच कधी नाही

कशी वाढली ही जवळीक जमले शब्द तुझ्या सोबत
भावना जुळल्या कधी माझ्या मन जुळले तुझ्या सोबत

सवय झाली मला तुझी आणि तुला पण असेच होत असेल
विना मला मेसेज केल्याचे तुला कसे काहीच करमत नसेल

मी पाहतोय वाट त्या दिवसाची जेव्हा भेट होईल आपली
विचार मांडले जातील समोर इच्छा पूर्ण होईल मनातली

असेल स्वप्न हे छोटे संपेल एका छोट्या क्षणात 
आठवणी असतील दोघांकडे घर करतील ते मनात

रिलेशन आपले हे वेगळे ते कधी मला उमजले नाही
कसे आलो तुझ्या जवळ माझे मलाच समजले नाही
कसे आलो तुझ्या जवळ माझे मलाच समजले नाही

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: माझे मलाच समजले नाही
« Reply #1 on: February 11, 2013, 12:41:31 AM »
Chex ji mast ekadam.!!!

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: माझे मलाच समजले नाही
« Reply #2 on: February 12, 2013, 08:01:58 PM »
धन्यवाद मित्रा ..... :)