Author Topic: तूं निराशा दे मला  (Read 1146 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
तूं निराशा दे मला
« on: February 13, 2013, 06:48:17 AM »
तूं निराशा दे मला
   विश्वास घेऊन काय करुं
जर धराच माझी नाहीं तर
   आकाश घेऊन काय करुं
काय करुं त्या दृष्टीला जी
   तृप्त कधीं होत नाहीं
काय करुं ह्या इच्छेला जी
   स्वीकार काहीं करत नाहीं
लाख सरोवरे ,अन अनेक
   सागर पालथे घातले
पण काय करुं मनाची
   तहान काहीं भागली नाहीं
तूं मला विष दे ही
   तहान घेऊन काय करुं
जीवनांत मृत्युचा आभास
   घेऊन काय करुं ।
मनावर संस्कारांच्या
   धुळेची परंपरा आहे
प्रत्येक फूलाच्या पाकळीवर
   अश्रूंची माला आहे
दुःखाची वाळवी
   हृदयाला लागली आहे
प्रत्येक स्वप्नसुमन मातीत
   मिसळले गेले आहेत
म्हणूनच तूं ग्रीष्म दे
   वसंत घेऊन काय करुं
असहाय या गुदमरण्यांत 
   श्वास घेऊन काय करूं ।
कधीं म्हणालो किं मला
   आपले स्वप्न बनू दे
कधीं इच्छिले किं मला
   आपल्या हृदयीं बसूं दे
मी तुझ्या दृष्टिची
   पायधूळ होऊन राहिन
फक्त तूं मला नेत्रींचे
    अश्रूं होऊन बसूं दे
कारण तुझ्या प्रीतिचा
   आभास होऊन काय करुं
आणि आपल्या अभिलाषेचे
     प्रेत घेऊन काय करुं  ।।
                      रविंद्र बेन्द्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

http://www.kaviravi.com/2013/02/love-poem_5080.html

« Last Edit: February 13, 2013, 06:48:35 AM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तूं निराशा दे मला
« Reply #1 on: February 13, 2013, 08:31:21 AM »
Chan kavita ahe..

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
Re: तूं निराशा दे मला
« Reply #2 on: February 13, 2013, 08:33:42 AM »
thanks
Sadhana

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: तूं निराशा दे मला
« Reply #3 on: February 13, 2013, 12:03:07 PM »
वाह! वाह! क्या बात है! मस्त.

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
Re: तूं निराशा दे मला
« Reply #4 on: February 13, 2013, 12:54:30 PM »
Thanks Madhura...
Sadhana

Deepak khaire

 • Guest
Re: तूं निराशा दे मला
« Reply #5 on: February 13, 2013, 02:08:39 PM »
1dum mast..........