Author Topic: अशीच आहे ती  (Read 4508 times)

Offline Er shailesh shael

 • Jr. Member
 • **
 • Posts: 77
 • Gender: Male
अशीच आहे ती
« on: February 13, 2013, 07:09:49 PM »
अशीच आहे ती ...
भिरभिर डोळ्यांनी माझी वाट बघणारी
"किती रे उशीर ..?" असं म्हणून भांडणारी
"मी वेळेवर आलोय तूच आधी येऊन बसलीस" असं बोलल्यावर
हळूच "सॉरी" बोलून जीभ चावणारी ....
अशीच आहे ती .......
पावसात चालताना वीज कडाडल्यावर घाबरून मला बिलगणारी
अन दुस-याच क्षणी लाजून दूर होणारी
"अरे भिजू नकोस आजारी पडशील" असं मला सांगून स्वत:च भिजणारी ...
अशीच आहे ती .....
मी गर्दीत दिसेनासा झाल्यावर कावरीबावरी होऊन मला शोधणारी
"हात का सोडलास रे..?हरवला असतास तर ..?"
असं बोलून पुन्हा माझा हात घट्ट पकडणारी
अशीच आहे ती ..........
मी दिलेलं गुलाबाचं फुल पुस्तकात जपून ठेवणारी
मी केलेली प्रत्येक कविता समजली नाही तरी "वा खूप छान!" बोलणारी
माझी प्रत्येक आठवण जीवापाड जपणारी
मला पूर्ण करणारी ......अशीच आहे ती .......

Marathi Kavita : मराठी कविता


Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: अशीच आहे ती
« Reply #1 on: February 13, 2013, 07:37:50 PM »
माझी "ती" हि अशीच आहे
छान

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: अशीच आहे ती
« Reply #2 on: February 15, 2013, 01:04:41 PM »
Khup chan kavita shailesh ji...

arpita deshpande

 • Guest
Re: अशीच आहे ती
« Reply #3 on: April 01, 2013, 04:51:47 PM »
मी दिलेलं गुलाबाचं फुल पुस्तकात जपून ठेवणारी
मी केलेली प्रत्येक कविता समजली नाही तरी "वा खूप छान!" बोलणारी
माझी प्रत्येक आठवण जीवापाड जपणारी
मला पूर्ण करणारी ......अशीच आहे ती ....
Ashich aste ti.....khuuuupch chan

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: अशीच आहे ती
« Reply #4 on: April 02, 2013, 11:23:24 AM »
 :) :) :)

Offline bhanudas waskar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 181
Re: अशीच आहे ती
« Reply #5 on: April 16, 2013, 01:58:06 PM »
nakkich shailesh,,,....khup chan aahe re kavy...mana pasun dhanywad.....
.
.
kharch...mast lihitos
.
.
khup sunder....

...ashich aahe ti...

mast
mast