Author Topic: तू सोबत असताना...  (Read 2962 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
तू सोबत असताना...
« on: February 13, 2013, 07:37:08 PM »
तू सोबत असताना...
चंद्राच देखणेपणही फिकं वाटत
चांदण्यांनी नटलेलं
रात्रीचं आभाळही रितं वाटत...
तू सोबत असताना...

पावसातल्या गारा
अन अंगावरचा तो
ओलसर शहारा
हवाहवासा वाटतो
तू असताना
पावसाची प्रत्येक सर
अन सरीचा प्रत्येक थेंब
तुझ्या गालांवर निजवावासा वाटतो
तू सोबत असताना...

तुला पाहताक्षणी
सुचलेली पहिली ओळ
तू जाताना मात्र
तो माझ्या कवितेचा शेवट वाटतो
शब्दागणिक वाढणारी अगतिकता
अन प्रत्येक ओळीमागे तुझे नाव
असा शब्दांचा खेळ मांडावासा वाटतो
तू सोबत असताना...

हातांमधला तुझ्या स्पर्शाचा भास
अन त्या स्पर्शातली तू
वाटा असतील भलेही वेगळ्या
पण प्रत्येक वाटेच्या शेवटी असशील तू
तुला सांगायचय एकदा
किती हसरे होतात क्षण सारे माझे
तू सोबत असताना...
तू सोबत असताना...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: तू सोबत असताना...
« Reply #1 on: February 15, 2013, 01:09:54 PM »
Shailesh ji khupach sunder lihiley...

Tu sobat asatana
Pruthvivarach swarga asate
Swargatlya apsarach kay
Nakshatrahi fike padate..
... Masta ekadam.