Author Topic: हृदयाच्या आगीच काय करायचं....  (Read 1534 times)

Offline nphargude

  • Newbie
  • *
  • Posts: 38
  • Gender: Male

हृदयाच्या आगीच काय करायचं.... :(   :'(
जेंव्हा प्रथम तुला पाहिले, माझे डोळे बोलून राहिले, हिच ती हीच ती जिची वाट पहात होतास तू किती..
हळूहळू हृद्यात तुझेच चित्र उमटू लागले, आठवण तुझी येता हे हृदय आतून धगधगू लागले..
धगधगता धगधगता ह्रुदयात आग तुझ्याच विचारांची लागली होती..
वाटायचे येशील का हि आग विझवायला सोडून सगळी नातीगोती..
वाटायचे मी नसेन आता कोणीच तुझा पण होऊ शकेन खास, तू फक्त हो म्हण पुरवेन तुझे सगळे अट्टाहास..
पण पण ..
माझ्या हृदयाला आग लावून तू गप्प का बसलीस, काहीतरी बोल नाहीतर ही आग भडकेल मोठी..
माझी चूक हीच का तुझ्या प्रेमात मी पडलो, मन हे बावरे विचार करता करता आज मी खूप रडलो..
या हृदयावर आता माझा हक्क नाही, एकदाच सांग मला तुझ्या मनातले सारे काही..
धकधकणाऱ्या हृदयाची आग आता कशी मी विजवू, हेच करायचे होते तर का हसलीस बोललीस पहिल्यांदा बघून मला तू..
उगीच माझा तू खेळ करत होतीस मला तुझ्या साम्राज्याचा प्यादा समजत होतीस..
माझी तर तू सम्राज्ञी होतीस हृदयाची तू राणी होतीस..
वेळ निघून गेली आता परकी मला तू वाटू लागली आहेस..
दिसत समोर तू फक्त एवढेच विचारायचय..
एकच सांग जाता जाता तू लावलेल्या हृदयाच्या आगीच काय करायचं.. हृदयाच्या आगीच काय करायचं..
- CA नितीन हरगुडे..
« Last Edit: February 13, 2013, 11:27:11 PM by nphargude »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: हृदयाच्या आगीच काय करायचं....
« Reply #1 on: February 15, 2013, 01:03:06 PM »
Nitinaji masta ekadam. Tumchya hrudayachi aag tashich rahudyat.
Kadhitari tumchya hrudyachi dhag tila janave
ani mag ti hi tashic tumchya premat padel...

... Regards