Author Topic: सखीच्या आठवणींचा  (Read 1151 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
सखीच्या आठवणींचा
« on: February 14, 2013, 01:13:40 PM »
सखीच्या आठवणींचा
 गुंफतो मी गजरा
नाही बोललो तरी 
बोलतात नजरा ।
  टप्पोरे नेत्र तिचे 
लाविती ओढ मना
  वाटे टेकावे ओंठ 
अन चुंबावे तयांना ।
  रोखलेले कोपाने 
पाहतां तेंच नेत्र
  विचार चुंबण्याचा
मनीच राहतो मात्र ।
  ओंठ नाजुक तिचे 
पाहता तोच विचार
  दूर होऊन नेत्रांवरून 
घसरतो ओंठावर ।
  रोवूनि दांत ओंठी 
निषेधते सखी जेव्हां
  दूरावतो मनामधून
चुंबनाचा विचार तेव्हां ।
  वाटे करावा स्पर्श 
काळ्याभोर केसांना
  कसे करुं ते आतां 
भासच फक्त असताना ।
  असा भास वेळीअवेळी
मनामध्ये होत असतो
  म्हणून वेळोवेळी मी
सारखा-सारखा
         फसत असतो  ।।
                            रविंद्र बेंद्रे

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

http://www.kaviravi.com/2013/02/love-poem_6.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: सखीच्या आठवणींचा
« Reply #1 on: February 15, 2013, 12:50:58 PM »
Sadhnaa ji khup sundar kavita ahe..