Author Topic: तुझ्या माझ्या प्रीतिचा  (Read 1387 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
तुझ्या माझ्या प्रीतिचा
« on: February 16, 2013, 10:02:33 AM »
तुझ्या माझ्या प्रीतिचा 
  रंग होता कसला ।
अखेर पर्यंत मजला
  तो नाहीं कळला ।
आतूरतेने जवळ येऊन 
  प्रेमाने आलिंगत होतीस
क्षणांत एका अचानक
  रागाने दूर जात होतीस ।
स्मित वदनानें कधी
  दुःखांत साथ देत होतीस
तर कधीं सुखांतही 
  फुरंगटून जात होतीस ।
संगे बसून जोमाने 
  भविष्य स्वप्नें रचित होतीस
साकार होणारी स्वप्नें 
  अनेकदा उधळीत होतीस ।
हातचा राखून न ठेवता 
  समर्पित होत होतीस
कधीं अस्वाभाविकपणें 
  दूर दूर रहात होतीस ।
आगळ्या तव प्रेमाची
  रीत मला  नाही कळली
कारण जीवनाबद्दल
  अचानक तुझी दृष्टी फिरली ।
क्षणांत एका लहरीच्या
  मृत्युची तूं कांस धरली
म्हणून प्रेमरंग जाणण्याची
  माझी इच्छा अपुरीच राहिली।। रविंद्र बेन्द्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/02/love-poem_8.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: तुझ्या माझ्या प्रीतिचा
« Reply #1 on: February 16, 2013, 10:09:08 AM »
Mast!

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तुझ्या माझ्या प्रीतिचा
« Reply #2 on: February 16, 2013, 10:25:48 AM »
Sadhna ji khup chan. Khaskarun...
 
हातचा राखून न ठेवता
  समर्पित होत होतीस
कधीं अस्वाभाविकपणें
  दूर दूर रहात होतीस ।
आगळ्या तव प्रेमाची
  रीत मला  नाही कळली
कारण जीवनाबद्दल
  अचानक तुझी दृष्टी फिरली
 ।क्षणांत एका लहरीच्या
  मृत्युची तूं कांस धरली
म्हणून प्रेमरंग जाणण्याची