Author Topic: एक उनाड स्वर  (Read 902 times)

Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 654
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
एक उनाड स्वर
« on: February 17, 2013, 02:39:59 PM »
एका उनाड स्वराची,
मला कळलेली भाषा.
माझ्या अबोध मनात,
पुसटशी चांदरेषा.
 
त्या वळीव बोटांनी,
मला गोंजारून.
केलं मला आपलंसं,
क्षणी कुशीत घेऊन.
 
न विचारता काही,
विचारले खूप काही.
मी हि सांगितले सारे,
पण बोललोच नाही.
 
फक्त हातात धरून,
एका हाताची थरथर.
नव्याने श्वास भरला,
उरात मुठभर .
 
त्या उनाड स्वराची,
सरली रात्र काळी.
त्याला गवसली नवी,
सात सुरांची मांदियाळी.
 
हसले एक हासू,
आनंदाच्या भरात.
आसवांनी भरला सूर,
त्या उनाड सुरात.


..........अमोल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: एक उनाड स्वर
« Reply #1 on: February 18, 2013, 10:16:17 AM »
chan kavita....avadali