Author Topic: तो दिवस आणि ती  (Read 1797 times)

Offline kuldeep p

  • Jr. Member
  • **
  • Posts: 164
  • Gender: Male
  • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
तो दिवस आणि ती
« on: February 17, 2013, 07:10:20 PM »
त्या दिवशी तिचीच वाट बघत होतो

त्या रस्त्याकडे टक लाऊन बसलो होतो

वातावरण एकदम शांत झाले होते

हवेची प्रत्येक झुळूक पालापाचोळा होती

जणू काय तिच्यासाठीच रस्ता साफ करत होती

ती दिसली मी आकाशात बघितले

आकाश निळसर झाले होते

आकाशही तिच्या स्वागतास आतुर झाले होते

ती आली, हवेला एक वेगळीच नशा आली

पक्षीही तिच्यासाठीच गाणी गाऊ लागली

ती जवळ आली, माझी होशील का? मी विचारले

तिने मात्र नाही म्हणत नाकारले

क्षणात माझ्या चेहऱ्यावरील  हास्य निखळले होते

मी पुन्हा आकाशाकडे बघितले

निळे आकाशही काळे झाले होते

माझ्या प्रमाणे त्याचे हि हास्य तिने हिरावून घेतले होते

ती तशीच परतीला निघाली होती

माझ्या डोळ्यातून आसवे टपकत होती

आकाशातूनही पाण्याचे थेंब टपकायला सुरवात झाली होती

माझ्या दुखाची जाणीव जणूकाय त्यालाही झाली होती

काय करावे समाजात नव्हते

देवाला विचारावे असेही वाटत नव्हते

तो हि हीच करू शकत नव्हता

तो हि हताश होता

त्याला त्याची चूक कळली होती
« Last Edit: February 27, 2013, 10:40:19 PM by praajdeep »

Marathi Kavita : मराठी कविता