Author Topic: प्रेमाचा जागतिक आठवडा  (Read 1192 times)

प्रेमाचा जागतिक आठवडा
« on: February 18, 2013, 12:10:34 PM »

ती त्याच्या जीवनात आली,
तो सुखावला.........!
ती त्याच्या जीवनातून गेली,
तो दुखावला.........!
 
तिला भेटला कुणीतरी सुंदर राजकुमार,
तो जुन्या आठवणीतच रमला बेसुमार......!
 
तो निभावत गेला प्रेम तिच्यावरचं
ती ही निभावत गेली प्रेम स्वतःच.......!
 
त्या दोघांचाही प्रेमाचा प्रवास चालूच राहिला,
आणि अचानकच प्रेमाचा जागतिक आठवडा आला.....!
 
February-7 (Rose Day)
ती गेली एक गुलाब घेऊन,
त्या तिच्या राजकुमराकडे....!
तो गेला पूर्ण गुलदस्ता घेऊन,
एका आजारी व्यक्तीकडे.....!
 
गुलाबाची खरी गरज कुणाला,
याची त्याला जाणीव होती...!
पण ती प्रेमात वेडी होऊन,
आपल्याच आजारी काकाला विसरली होती.....!
 
February -8 (Propose day)
ती गेली आपल्या प्रियकराकडे,
प्रेमाचा प्रस्ताव पुन्हांदा मांडण्यासाठी......!
तो गेला शंकरांच्या मंदिरात,
मनुष्य हित्ताची मागणी मागण्यासाठी.....!
 
तो केला मनापासून विचार,
संपूर्ण मानवतेच......!
तिला मात्र प्रिय होत,
प्रेमातले सुख स्वतःच........!
 
February -9 (Chocolate Day)
ती घेतली भली मोठी डेअरी मिल्क,
आपल्या लाडक्या प्रियकराला देण्यासाठी.....!
त्याने घेतला डेअरी मिल्कचा एक पुडाच,
कॉलोनितल्या लहान मुलांना वाटण्यासाठी.....!
 
त्याने दिलेले chocolate ,
मुलांनी मटक्या देत खाल्ले.....!
तिने दिलेले डेअरी मिल्क प्रियकराने,
bag मध्ये ठेवले, आणि ते तसेच राहिले....!
 
February -10 (Teddy-Bear Day)
ती गेली आपल्या प्रियकरासोबत,
एका लव्हर point वर फिरण्यासाठी.....!
तो गेला एका अनाथ आश्रमात,
अनाथ बालकसोबत खेळण्यासाठी.....!
 
त्याचा दिवस आनंदात गेला,
अनाथ मुलांना मन-खुल्लास हसवण्यात......!
तिचाही तो दिवस गेलाच,
रोजचेच निरार्थक गप्पा मारण्यात......!
 
February -11 (Promise Day)
ती गेली खुशीत प्रियकराच्या घरी,
आयुष्यभर साथ देण्याचे वचन देण्यासाठी...!
तो गेला सकाळीच डोंगरावर,
निसर्गाला जपण्याची शपथ घेण्यासाठी.......!
 
त्यांनी लावलेले दोन रोपटे,
वाढल्याशिवाय राहणार नाही.......!
पण तिच्या प्रेमव्रक्षाचे पुढे काय होणार?
तिला हि नेमके माहित नाही..........!
 
February -12 (Hug Day)
तिने कवटाळून आलिंगन दिली,
तिच्या नशीबवान प्रियकराला......!
त्याने दिला एक जादूची झप्पी,
एकट्याच राहणाऱ्या शेजारच्या आजीला.....!
 
त्याने जमवले एक अतूट नाते,
वात्सल्ये आणि खऱ्या प्रेमाचं.....!
तिचेही एक नाते होतेच,
आकर्षक, मोहक, क्षणीक सुखाचं.......!
 
February -13 (Kiss Day)
ती गेली ओठांना लाली लाऊन,
प्रियकराच्या कंपीत ओठांना स्पर्शण्यासाठी.......!
तो उचलला एका खेळणाऱ्या नवजात शिशूला,
प्रेमाने मुक्का मुक्का घेण्यासाठी......!
 
त्याच्या छोट्याशा पप्पीने,
बालकाची मात्र कळी खुलली.....!
तिची एवढी मोठी देणगी सुद्धा,
प्रियकराला अगदी अर्धीच वाटली.......!
 
February -14 (Vallentines Day)
ती गेली प्रियकरासोबत एकांतात,
राहिलेली कालची अर्धी भेट पूर्ण करण्यासाठी.....!
तो गेला तिला भेटलेल्या पुरीच्या जागेवर,
तिच्यावरचे प्रेम निभावण्यासाठी......!
 
तिचा हा पूर्ण दिवस गेला,
गोड गोड स्वर्गसुख भोगण्यात......!
आणि हा वेद वेळ घालवला,
तिच्या आठवणी काढून रडण्यात......!
 
रडता-रडता त्याला एकदा,
गेलेला पूर्ण आठवडा आठवला.....!
तो उठला, डोळे पुसला,
मनापासून देवाचा आभार मानला....!
 
जणू त्याला एक शक्ती मिळाली,
अचानकच तो आनंदी होऊन गालात हसला....!
सत्ये म्हणजे आज प्रथमच त्याला,
प्रेमाचा खरा अर्थ कळला.....!
 
तो निघाला एका दिव्य दिशेला,
तिला कायमचेच विसरण्यासाठी.....!
आणि प्रेमाचा आठवडाच काय तर,
प्रेमाचं आयुष्यच सजवण्यासाठी.....!
 
त्या दिवसापासून ते नसणारे दुख,
त्याला कधी आठवलेच नाही.......!
इतरांच्या दुखात शामिल होताना,
खर दुख सुद्धा जाणवले नाही.....!
 
तिचे नंतर काय झाले, हे जाणून घ्यायचं तर,
खरच मला ते कधीही जमले नाही.....!
कारण माझ्या कहाणीत ही आता,
तिला काही पात्र ही उरलं नाही.....!
-♥ღღ♥SaDBoY ßσßßy♥ღღ♥ ι мαкє мα σωη ωαу

Marathi Kavita : मराठी कविता