Author Topic: येऊन...  (Read 1134 times)

Offline Adityaajadhav

 • Newbie
 • *
 • Posts: 6
येऊन...
« on: February 18, 2013, 09:51:06 PM »
एक अबोल पाकळी
हळूच गालात हसली...
कोवळ्या रंगात न्हाऊन
फूल होऊन लाजली...!!!

काय सांगू कथा
स्वतास पाहून थिजलि..
डोळ्यात माझ्या येऊन
स्वप्न रंगवून गेली...!!!

जीवनात ती येऊन
सावली होऊन गुंतली..
क्षण सारे फुलवित
मेंदीसम ती रंगली...!!!

पाहून राघु मैनेला
पहा लालेलाल झाली..
हळूच मिठीत शिरून
रंगात माझ्या भिजली...!!!

मनात माझ्या येऊन
कविता होऊन रुजली..
शब्दाना आज माझ्या
अर्थ देऊन ती गेली...!!!

© आदित्य अ. जाधव...!!!
« Last Edit: February 18, 2013, 10:02:56 PM by ajadhav334 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: येऊन...
« Reply #1 on: February 19, 2013, 10:18:42 AM »
chan kavita... avadali :)

Offline UNREVEALED MYSTERY

 • Newbie
 • *
 • Posts: 43
Re: येऊन...
« Reply #2 on: February 20, 2013, 03:36:52 PM »
aavdali.. (Y)