Author Topic: तुला पहिलं की  (Read 1981 times)

Offline अजय जावळे

 • Newbie
 • *
 • Posts: 25
 • Gender: Male
  • http://photo bucket.com
तुला पहिलं की
« on: February 18, 2013, 09:55:20 PM »
तू लाजलिस की,तुझ्या गालावरची
खळी खुप सुंदर दिसते,
मी पाहिलं की,ती खळीही नेहमी
माझ्याकडे पाहून हसते,
कुणाची नजर न लागो म्हणून मीच,
काजळ हॊउन ओठाखाली बसतो
तुझ्याकडे पाहनाऱ्या नजरेंना त्या नेहमी
तुझ्यापासून दूर करत असतो
खरं सांगू,
तुला पहिलं की,
तिचाच चेहरा दिसतो।।।।
वाऱ्यावर उड़नाऱ्या केसांना जेव्हा
तू हळवारपने सावरतेस
गालावर रूळनारा केस बाजूला करताना
कधी नजर माझ्यावर फिरवतेस
तेव्हा नकळत का होईना माझं प्रतिबिंबही
मी तुझ्यात हरवून जातो
अबोल मनाला पुन्हा माझ्याशीच तुझ्या मिठीत
विसावताना पाहतो
खरं सांगू,
तुला पहिलं की,
तिचाच चेहरा दिसतो।।।।   


Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुला पहिलं की
« Reply #1 on: February 19, 2013, 10:21:39 AM »
 :)