Author Topic: अधांतरी तूं राहूं नको  (Read 1619 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
अधांतरी तूं राहूं नको
« on: February 21, 2013, 09:25:00 AM »
 जीवनांतून दूर जाऊनि
      स्वप्नांमध्ये रोज येशी
मनांमधली स्मृतिदुःखे
   रोज रोज ती चाळविशी ।
अपुरें जें स्वप्न राहिले 
   देशी येऊनि कां स्वप्नांत
सुखाचा तो क्षण एकच 
   देशी दुःख सागरांत ।
मम सुखाची होती इतुकी 
   काळजी तुझ्या मनांत   
कां गेलीस सोडून 
   मजला एकाकी विरहांत ।
माझ्या साठी इतुके तूं 
   कष्ट हें घेउं नको
अनंतातून अशी रोज
   माझ्या स्वप्नीं येउं नको ।
जवळीक तुझी नको मला 
   असें मात्र समजूं  नको
वेड्या या प्रीतिसाठी 
   अधांतरी  तूं राहूं नको ।।
रविंद्र बेन्द्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/02/love-poem_12.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: अधांतरी तूं राहूं नको
« Reply #1 on: March 28, 2013, 10:45:55 PM »
Sadhanaji khup chan kavita ahe...

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: अधांतरी तूं राहूं नको
« Reply #2 on: March 30, 2013, 02:45:40 PM »
प्रिय साधना/ रवींद्र

कविता खूपच छान आहे!
एक प्रश्न पडलाय! आपण साधना कि रवींद्र?
प्रतिसाद कुणाला द्यायचा? :) :( :) :(

मिलिंद कुंभारे