Author Topic: माझं नेहमी असं व्हायचं  (Read 1406 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
माझं नेहमी असं व्हायचं
« on: February 21, 2013, 07:50:48 PM »
माझं नेहमी असं व्हायचं
नाही म्हणता म्हणता मन तिची वाट पहायचं

तिच्या एका नजरेसाठी 
पापण्यांच गाव आतुर व्हायचं
तिच्या येणा-या वाटेवर
तिथेच घुटमळत राहायचं
माझं नेहमी असं व्हायचं

कधी तिच्यावर कविता करायचं
तर कधी कवितेत तिलाच शोधायचं
तिला आठवताना शब्द सुचायचे खरे
पण ती समोर आली कि
विसरलेल्या शब्दांमागे धावायचं
माझं नेहमी असं व्हायचं

कधी तिच्या स्वप्नात निजायचं
तर कधी तिच्या आठवणींच्या पावसात भिजायचं
कधी स्वताला प्रेमात पडण्यापासून आवरायचं
तर कधी "प्रेमात पडलोय आता"
असं म्हणून स्वताला सावरायचं
माझं नेहमी असं व्हायचं

कधी चंद्र तर कधी चांदणी
कधी वा-याची झुळूक तर कधी पावसाची वेडी सर
या सा-यात तुला पहायचं
माझ्या चंद्राला कुणाची नजर लागू नये म्हणून
ओंजळीत तो लपवायचो खरा
पण चंद्रच तो
कितीही लपवलं तरी तिचं सौंदर्य
माझ्या ओंजळीतून वाहायचं
माझं नेहमी असं व्हायचं
माझं नेहमी असं व्हायचं....

Marathi Kavita : मराठी कविता