Author Topic: सांग सये...  (Read 1037 times)

Offline Vaibhav patade

 • Newbie
 • *
 • Posts: 12
सांग सये...
« on: February 23, 2013, 02:30:47 PM »
सांग सये काय मी काय तुला गं द्यावे,
अन् काय तु मजकडून घ्यावे...
अवघ नक्षत्रांच देण तुजठायी,
आता काय राहिले नवे...

मी तुला चंद्र देता,
बघ रात्र ही हिरमुसलेली...
तो आणावया जाता,
चांदणी त्याच्या कुशित निजलेली....
त्या निजलेल्या चांदणिला,
मी गं कसे ऊठवावे...
सांग सये काय मी काय तुला गं द्यावे,
अन् काय तु मजकडून घ्यावे...

एक गुलाबाचं नाजुक फुल,
काट्यांवरती डोलत होत...
अंतरातिल सहज सुगंध,
मुक्त हतांनी उधळीत होत...
ते खुडायाला जाता,
काट्यांनी का अडवे यावे...?
सांग सये काय मी काय तुला गं द्यावे,
अन् काय तु मजकडून घ्यावे...

तुझ्यासाठी ताज बाधांवा,
एवढी ऐपत माझी नाही...
ह्रदय माझे झोपडीपरी,
राजमहलाहून कमी नाही...
इंद्रपुरीची अप्सरा तू,
तु का तिथे रहावे...?
सांग सये काय मी काय तुला गं द्यावे,
अन् काय तु मजकडून घ्यावे...
वैभव पत्ताडे
12/02/2013

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vijay biradar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • ohh my god bless me
Re: सांग सये...
« Reply #1 on: February 23, 2013, 02:48:55 PM »
KHUP CHAN

Offline Vaibhav patade

 • Newbie
 • *
 • Posts: 12
Re: सांग सये...
« Reply #2 on: February 23, 2013, 02:55:11 PM »
धन्यवाद विजय जी