Author Topic: मी हसले तर....  (Read 2321 times)

Offline Shashi Dambhare

  • Newbie
  • *
  • Posts: 10
मी हसले तर....
« on: February 25, 2013, 04:40:29 PM »
मी हसले तर.

तू येतोस कितीदा,
आणि कितीदा जातोस....
मी हसले तर कविता,
आणि रुसले तर गझल लिहतोस.........

तुझ्या नात्याला अर्थ नाही
पण, तुझ्या दोस्तीत स्वार्थ नाही
म्हणून जरा बोलावे तुझ्याशी
तर तू मनावर घेतोस...........मी हसले तर....

तू " वेडा पीर " दिसतोस
जराजराशाने चिडतोस
तुझ्या माझ्या संदर्भांना
कधी जोडतोस...कधी तोडतोस .....
तुझीच तोडफोड...तुझीच उरस्फोड
वर दोष मला देतोस.........मी हसले तर.....

माझे आनंदाचे घर
माझे गुलाबी आंगण
माझ्या मानेभोवती सुत्र
माझे सोनियाचे कंगण
तुला अर्थ कळत नाहीत
तुला बंध सलत नाहीत
सारे सोडून ये म्हणतोस
कधी घेऊन ये ही म्हणतोस...........मी हसले तर....

माझे मातीचे पाय
मी जमिनीशी ठाम
मला आकाशाची भूल नाही
कि नाही वा-याशी काम
मी माझ्यातच लहरते
माझ्यातच बहरते
तु उगाचच तुझे अर्थ जोडतोस.....
मी हसले तर कविता
रुसले तर गझल लिहतोस..............!

शशी.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: मी हसले तर....
« Reply #1 on: February 26, 2013, 12:25:09 PM »
Chan kavita

Murad

  • Guest
Re: मी हसले तर....
« Reply #2 on: February 27, 2013, 05:17:07 PM »
Khup Khup Chhan. I Like This


arpita deshpande

  • Guest
Re: मी हसले तर....
« Reply #3 on: March 01, 2013, 08:08:30 PM »

माझे आनंदाचे घर
माझे गुलाबी आंगण
माझ्या मानेभोवती सुत्र
माझे सोनियाचे कंगण
तुला अर्थ कळत नाहीत
तुला बंध सलत नाहीत
सारे सोडून ये म्हणतोस........ATISUNDAR