Author Topic: तू ओळखलंय मला ..................  (Read 1888 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
तू ओळखलंय मला ..................
« on: February 27, 2013, 09:49:27 PM »
तू ओळखलंय मला ..................

 आनंदाला मनात भरून

 उत्साहाचे वारे होऊन

 मी धाव घेतो तुझ्याकडे

 फक्त तुझ्या मनात

 आनंद भरून टाकण्यासाठी

 अन माझं तुझ्यावरच

 प्रेम व्यक्त करण्यासाठी .............

 मनात एवढाच भाव

 तुझ्या मनानं तो आनंद

 भरून घ्यावा नसानसांत

 कुठल्याही वेदनेन कधीच

 राहू नये तुझ्या घरात ...........

 पण एवढी माफक अपेक्षाही

 तू पूर्ण करत नाही

 आलेले सुखाचे क्षण

 ओंजळीत भरत नाही

 तो सुखाचा क्षण घेऊन

 मी हि आनंदान जगीन

 तू दूर असूनही

 तुझ्यासोबत मी राहीन

 पण एवढाही माझा हट्ट

 तुला मान्य नसतो

 माझं काय मी तरीही

 तुझ्याच धुंदीत जगत असतो

 वाटत तेव्हा काही काळ

 तुझ्याशी बोलूही नये

 पण तुझा फोन आल्यावर

 झालं गेलं सार विसरून जातो

 इतका कसा वेडा मी

 काहीच कळत नाही

 तू ओळखलंय मला

 तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही .

 कवी : संजय एम निकुंभ , वसई

 दि. २५.२.१३ वेळ : ६.०० संध्या .

Marathi Kavita : मराठी कविता