Author Topic: जन्मांतरीची गांठ…  (Read 1854 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
जन्मांतरीची गांठ…
« on: March 05, 2013, 03:10:55 AM »
जन्मांतरीची गांठ मारली
  क्षणांत एका विसरुनि गेली
अजुनि कळेना माझे मला
  भूल अशी ही  कशी पडली ।
सात पाऊले मिळून टाकिली
  अग्नि समोर शपथ घेतली
क्षणांत धूंदी कशी उतरली
  आण घेतली कशी विसरली ।
नव्हती छाया वैफल्याची पडली
  अतृप्तता कधी मनीं न शिवली
असुनि जीवन मनासारखे
  कुणा दुष्टाची दृष्ट लागली ।
जीवन सुखे जी तशी राहिली
  मिळवण्याची आस लागली
एकदाचं पुन्हा स्वप्नांत तरी
  म्हण प्रेमाने मला आपली ।।
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/02/love-poem_25.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: जन्मांतरीची गांठ…
« Reply #1 on: March 05, 2013, 09:13:55 AM »
Sadhanaji apratim kavita ahe...

Offline Anan.mhatre

 • Newbie
 • *
 • Posts: 12
 • Gender: Male
 • तुझ विन अनंता !!
Re: जन्मांतरीची गांठ…
« Reply #2 on: March 05, 2013, 03:44:35 PM »
sadhanaa; khup chaan rachana ahe;;;;;mala ek chotasa shabd  badal karayala avadel ithe.....

सप्तपदी(सात पाऊले) मिळून टाकिली
  अग्नि समोर शपथ घेतली
क्षणांत धूंदी कशी उतरली
  आण घेतली कशी विसरली ।