Author Topic: तुझं येणं  (Read 2898 times)

Offline देवेंद्र

  • Jr. Member
  • **
  • Posts: 90
तुझं येणं
« on: March 06, 2013, 05:01:44 PM »
तुझं येणं,

जणू,
मिट्ट काळोखात
मुसळधार पावसात
निसरड्या वाटेवर
लख्ख वीज चमकावी

ग्रीष्मातल्या माध्यानी
तापलेल्या धरेवर
वळवाच्या धारांनी
संततधार धरावी
 
ओसाड वाळवंटात
मृगजळामागे धावताना
तहानलेल्या जीवाला
समोर मरुद्द्यान दिसावं

अवसेच्या काजळ रात्री
एकट्या कातरवेळी
मोकळ्या आभाळी
फुलावा चांदण सोहळा

.........अगदी तसंच   


- देवेंद्र

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुझं येणं
« Reply #1 on: March 07, 2013, 12:09:46 PM »
chan...