Author Topic: कुणीतरी नाव तुझं..  (Read 2142 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
कुणीतरी नाव तुझं..
« on: March 06, 2013, 10:54:38 PM »
तू आलीस अचानक काम घेवून कुठलं
न मागता माझ्यासाठी झाड मोहरून गेलं

मरतांना दो दिसांचं स्वप्न सजून आलं
नकळत माझ्या मला जगण कळून गेलं

तुझ्यासाठी न लिहण जरी होत ठरविलं
सवे तुझ्या आलं गाण मन भुलवून गेलं

कसं सांगू तुला मज कुणी कुणी ठकविलं
कुणीतरी नाव तुझं चुकून घेवून गेलं

विक्रांत प्रभाकर

« Last Edit: April 19, 2014, 01:20:42 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता