Author Topic: ती अन तू .......  (Read 2424 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
ती अन तू .......
« on: March 09, 2013, 07:07:01 AM »
ती अन तू .......

...............................

ती

माझ्या मनातलं

सारं काही जाणते

तुझ्यावरच प्रेम

त्या प्रेमाच्या भावना

जे बेधुंद क्षण

जगतो मी

त्या प्रत्येक क्षणाची

ती साक्षीदार असते

म्हणून ती हि

मुक्तपणे विहार करते

माझ्यासोबत कधीही , कुठेही

तुझ्यावर प्रेम करतांना

माझं मन

लहान बाळ होऊन जातं

म्हणून ती ही तशीच

लहान होऊन जाते ............

तू

सारं काही कळूनही

मी तुला समजूनही

कधीच मोकळ्या मनानं

वागू शकत नाही

अवघडलेपण सतत

उराशी कवटाळून ठेवतेस

जे धुंद क्षण येतात भेटण्यास

त्याच वेळेस ते

ओंजळीत न घेता

मुठ आवळून घेतेस

तेव्हा ती  हि असते समोर

तुझ्याकडे बघून हसते

अन मनातल्या मनात म्हणते

किती वेडी आहे ही

तेव्हा माझंही मन

उदास होऊन जातं

तू कधीच समजून घेणार नाहीस

म्हणून खिन्न होऊन जातं

तेव्हा तीच मला सावरते

माझा हात धरून

मला पुन्हा घेऊन जाते

त्या प्रेमाच्या वेगळ्या जगात

बेधुंद जगण्यासाठी

कारण तिलाच फक्त कळलीय

माझ्या मनातली प्रिती .                                  कवी : संजय एम निकुंभ , वसई

                                 दि . ०९.०३.२०१३ वेळ : ६.४० स.

  

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: ती अन तू .......
« Reply #1 on: March 20, 2013, 09:48:42 AM »
 :)