Author Topic: चंद्र माझा  (Read 1903 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
चंद्र माझा
« on: March 12, 2013, 11:26:44 AM »
मधुरा,
तुझ्या चारोळीच्या रिप्लाय वरून सुचलेली कविता.....  :)
 
नभीचं चांदणं
घागरीत तुझ्या
पाण्यात दिसतो
............................चंद्र माझा
 
उठल्या तरंगी
मज बघून शेजारी
पाण्यात लाजला
............................चंद्र माझा
 
वळता सांडली
ती भरली घागर
चांदण्यात भिजला
............................चंद्र माझा
 
घेउनि जवळ
मी वेचता चांदणे
मिठीत हसला
............................चंद्र माझा
 
लपला ढगांत
नभीचा तो चांद
कुशीत तरीही
............................चंद्र माझा
 
नभीच चांदण
मग लोपले पूर्वेला
निजला पहाटे
............................चंद्र माझा
 
 
केदार......

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: चंद्र माझा
« Reply #1 on: March 12, 2013, 09:33:04 PM »
वाह ! मस्त. खूप सुंदर!

चांदण्या नभीच्या
नदीत उतरून,
आल्या हळूच वाहून,
मझ्या ग घागरीत.....

चंद्र पडला एकटा,
ढगाच्या आडून,
पाहतो डोकावून,
माझ्या ग घागरीत......

शोभा हि रातीची,
दृष्टी सुखावली,
येऊन विसावली,
माझ्या ग घागरीत......

मी एक नव कडव जुळवल आहे. म्हणून पोस्ट करतीये. कसं वाटलं ते सांग.

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: चंद्र माझा
« Reply #2 on: March 13, 2013, 10:35:55 AM »
kya baat.... chan.
 
doghani don vegale chandr lihile aahet :)

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: चंद्र माझा
« Reply #3 on: March 14, 2013, 11:50:00 AM »
वाह! मस्त !मधुराजी आणि केदाजी दोघांना

खूप मस्त

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: चंद्र माझा
« Reply #4 on: March 14, 2013, 03:09:07 PM »
praajdeep, Thanks.

अक्षरा

 • Guest
Re: चंद्र माझा
« Reply #5 on: March 15, 2013, 08:43:45 PM »
खूप सुंदर केदारजी आणि मधुराजी..!!! :)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: चंद्र माझा
« Reply #6 on: March 15, 2013, 11:59:17 PM »
Thanks Akshara!

Offline Amey Sawant

 • Jr. Member
 • **
 • Posts: 109
 • Gender: Male
Re: चंद्र माझा
« Reply #7 on: March 16, 2013, 09:33:25 AM »
superb....kedar ji ani madhura ji

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: चंद्र माझा
« Reply #8 on: March 17, 2013, 09:12:49 PM »
मला हि गझल चारोळी वाटतेय ,मस्त आहे .

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: चंद्र माझा
« Reply #9 on: March 18, 2013, 02:35:07 PM »
Amey dada,
Thanks!