Author Topic: स्वप्नधुन्दि  (Read 902 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
स्वप्नधुन्दि
« on: March 12, 2013, 04:42:44 PM »
स्वप्नधुन्दि

स्वप्नधुन्दितलि  तू स्वप्नसुंदरी !
फुलाबागेतली तू फुलराणी !
सोडून स्वप्नील दुनिया ;
मनोवनात माझ्या
अवतरशील का ?
रुक्ष जीवनात माझ्या ;
वसंत होऊन
बहरशील का?

कवीमनाची माझ्या
तूच नायिका !
चित्रशैलीत माझ्या
तुझीच प्रतिमा !
काव्यास माझ्या;
साथ सुरांची
देशील का?
चित्रांत तुझ्या
रंग उमेदीचे
उधळ्शील का?

अथांग भवसागरात
उभी ती प्रीतनौका!
दिशाशून्य असा मी
तीत एकटाच का?
तुजप्रीतीच्या लाटांचा
सहारा मज देशील का?
भटकलेला मी!
किनारा मज दावशील का?

मिलिंद कुंभारे
« Last Edit: March 12, 2013, 04:45:00 PM by milind kumbhare »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: स्वप्नधुन्दि
« Reply #1 on: March 13, 2013, 10:32:50 AM »
 :)  milel! milel! ;)

मिलिंद कुंभारे

 • Guest
Re: स्वप्नधुन्दि
« Reply #2 on: March 13, 2013, 10:44:28 AM »
प्रिय केदार ,
मित्रा ती मला केव्हांच मिळाली!
ही कविता मी खूप वर्षाआधी लिहिलेली!
तुम्हा सर्वांशी संवाद साधायचा म्हणून एम के मध्ये पोस्ट केली!

धन्यवाद