Author Topic: अबोल प्रीत  (Read 1687 times)

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
अबोल प्रीत
« on: March 13, 2013, 01:49:06 PM »

अबोल प्रीत

तुजकडे पाहता
तुज नयनात
मी हरवतो!
तुला नकळत
तुझ्या प्रीतीचा
गोडवा मी चाखतो!

तू हसंता
तुज गालांत
उमटलेला
तो इवलासा चंद्र;
तास-न-तास
मी न्याहाळतो!

तू बोलता
तुज शब्दांत
तुझ्या मृदू भावनांचा
स्पर्श मला जाणवतो!

प्राणसखी ग!
प्राणप्रिये ग!
अशी कशी ही
अबोल प्रीत!
ना गीत, ना सूर;
परी  नुसताच आभास!

मिलिंद कुंभारे

Marathi Kavita : मराठी कविता