Author Topic: स्वरलहरी  (Read 1153 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
स्वरलहरी
« on: March 14, 2013, 01:20:56 PM »

स्वरलहरी

सुमधुर असे गीत तुझे!
तुझ्या गीतांत सूर नवे!
अन  शब्द तुझे जणू चांदणे!

कधी कधी मज वाटतसे;
सप्तसूरातला व्हावा मी
एखादा सूर गडे!
अन गाता गाता तुजसंगे;
मैफलीत तुझ्या हरवून जावे!

कधी कधी मज वाटतसे;
विसरून जावे दुरावे तुझ्या माझ्यातले;
क्षणभर समीप तू माझ्या असावे;
अन स्वरलहरींत तुझ्या मी विलीन व्ह्वावे!

कधी कधी मज वाटतसे;
बेधुंद मी असे स्वैरभैर व्हावे;
अन अधरांतून हलकेच ओघळते;
पुष्प तव हळुवार भावनांचे;
पापण्यांत नयनांच्या अलगत मिटावे!

सुमधुर असे गीत तुझे!
तुझ्या गीतांत सूर नवे!
अन  शब्द तुझे जणू चांदणे!

मिलिंद कुंभारे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: स्वरलहरी
« Reply #1 on: March 14, 2013, 03:35:34 PM »
सुंदर!

milind kumbhare

 • Guest
Re: स्वरलहरी
« Reply #2 on: March 14, 2013, 04:01:07 PM »
मधुरा ताई

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

मिलिंद कुंभारे


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: स्वरलहरी
« Reply #3 on: March 14, 2013, 04:17:23 PM »
मिलिंद छान ......
 
कधी कधी मज वाटतसे
तू माझा सूर अन
मी तुझे गीत व्हावे
जीवनभर हे प्रेम संगीत
असेच गात रहावे..........
असेच गात रहावे.  :)
 
 
केदार......
 
मित्रा रीप्लाय गेस्ट  लोगिन मधून का देतोस?

Offline vallabh11

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: स्वरलहरी
« Reply #4 on: March 14, 2013, 09:00:22 PM »
Chan

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: स्वरलहरी
« Reply #5 on: March 19, 2013, 09:58:09 AM »
प्रिय केदार आणि वल्लभ!

अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

मिलिंद कुंभारे  :)