Author Topic: जीवन आणि संसाराचा...  (Read 1263 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
जीवन आणि संसाराचा...
« on: March 20, 2013, 12:43:46 AM »
जीवन आणि संसाराचा...
जीवन आणि संसाराचा 
विरह हा एक भाग असतो
म्हणूनच मनुष्य तेव्हां
आत्म परीक्षण करतो ।
संसारात होते वाटले 
माणूस 'स्व' विसरून जातो
अनुभवास मात्र येते
'स्व' तसाच कायम असतो ।
मी मला कसा,तसेच 
दुसऱ्याला कसा वाटतो
ह्याचे ज्ञान प्राप्त होऊन 
'मी' फार तोकडा पडतो ।
जर काहीं विसरत असेल
तर तो दुसऱ्यास विसरतो
त्याच्याकडे फक्त तो   
एक छाया म्हणून बघतो ।
प्रीति,प्रेम,साथी हा   
फक्त एक आभास ठरतो
भावनांनाही त्यांत अखेर   
कुठे ही ना वाव उरतो ।
जीवनांत अशा विचाराला 
कधींच कुठं थारा नसतो ।
पण 'मी-माझं' म्हण्णार्याला 
तो विचार कधीं ना शिवतो
जीवनांत माणूस एकटा आहे 
तो एकटाच रहात असतो ।
हेंच एक सत्य आहे 
बाकी सर्व आभास असतो ।
त्यांच आभासांत राहून
मनुष्य जीवन जगत असतो
संसार माझा सुखाचा 
असेच भासवत  असतो ।
म्हणूनच विरहांत जेव्हां   
आत्म परीक्षण मी करतो
प्रीति -संसारावरील सारा 
विश्वासच उडून जातो ।।
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/02/miscellaneous_9.html
« Last Edit: March 20, 2013, 12:46:43 AM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता

जीवन आणि संसाराचा...
« on: March 20, 2013, 12:43:46 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,415
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: जीवन आणि संसाराचा...
« Reply #1 on: March 20, 2013, 09:33:52 AM »
जीवनांत माणूस एकटा आहे
तो एकटाच रहात असतो ।
हेंच एक सत्य आहे
बाकी सर्व आभास असतो । :( :(

पण तरीही कुणाची तरी चाहूल
त्याला नेहमीच जाणवत असते!
कुणी माझा एक सखा असावा;
असे त्याला नेहमीच वाटत असते! :) :)


मिलिंद कुंभारे  :-\ :-\

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):