Author Topic: अशीच एक जीवनातील संध्याकाळ,  (Read 1499 times)


अशीच एक जीवनातील संध्याकाळ,
पायाखालची वाट संपत नव्हती...
दूरवरून ती खुणवत होती,
मंदिराच्या पाय-यावर बसू म्हणत होती...
ती पाय-यावर जाऊन बसली ही होती...
नाही म्हणता म्हणता ,
मी ही मंदिराच्या पाय-या चढून गेलो ...
सैरभैर आयुष्याच्या नाजूक वळणावर,
आम्ही खूप बोललो, खूप हसलो....
आणि हे हिरवे क्षण मी,
मनाशी घट्ट धरून ठेवलो....
मग गप्पात आमचे बालपण आठवलं,
धो-धो पाऊस पडायचं.....
त्या पावसात आम्ही चिंब होऊन ,
गा-या गा-या भिग-या खेळायचं....
एकमेकांची नावे लिहून ,
पावसात कागदी होड्या सोडायचं....
लगेच आम्ही भानावर आलो,
क्षणात मन कासावीस झालं....
पण आज नक्कीच वाटते ,
माझी जीवन होडी किनारा गाठेल तेव्हा गाठो,
या प्रेमाच्या सागरात तिला फिरू दे....
माझ्या जीवन होडीला धुंद होऊन नाचू दे....
आणि ती हळूच माझा हात,
आपल्या गुलाब स्पर्शी हातात घेते....
आणि हे ऋण मी,
हळव्या मनाच्या कोप-यात कायमचा जपून ठेवतो....
त्या दिवशी कुणी मिळाल्याचं वाटलं,
पायाखालची जमीन संपल्यासारखे वाटलं....
मनातला पाऊल थांबून गेला...
आम्ही मंदिराच्या पाय-या उतरू लागलो,
पुन्हा मंदिरात भेटच ठरवून.............!
-♥ღღ♥ßσßßy♥ღღ♥ ι мαкє мα σωη ωαу

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Good One :)