Author Topic: माझी स्वप्नपरी  (Read 1892 times)

Offline Ravi Jadhav

 • Newbie
 • *
 • Posts: 13
 • Gender: Male
 • dream of passion
माझी स्वप्नपरी
« on: April 02, 2013, 11:11:24 AM »
        माझी स्वप्नपरी

मित्रांनो  प्रेम सर्वांनी केले आहे
सर्वांच्या आयुष्यात एक स्वप्नपरी आहे
माझ्या हि आहे
आपण  नेहमी त्या स्वप्न परी च वर्णन कवितेत करण्याचा
प्रयत्न करतो
आसाच माझा एक प्रयत्न
तिच्यासाठी .... माझ्या शब्दात

खरच स्वप्नाली तू खूप छान हसतेस
हास्य फुलवून ,चेहेरा खुलवून
ह्या मन वेड्याच्या मनात वसतेस
खरच स्वप्नाली तू खूप छान हसतेस
साधे सरळ रूप तुझे
मोहुनी टाकती मन माझे
टक मक टक मक बघतो तरीही
कमी होत नाही हूर हूर तेचे ओझे
शांत साउली नखरेल बाहुली
प्रेमाच्या गंधात स्वार असतेस
खरच स्वप्नाली तू खूप छान हसतेस

अबोल मी हि अबोल तू हि
भाव भावनांचा खेळ चालला
फुटत हि नाही ओठातून काही
शब्द जुळता सूर मिळेना
तुझ्या ह्स्स्याचे गुपित कळेना
दिसतेस सुंदर गर्व न तुजला
ह्याच गोष्टीचा अभिमानच मजला
वेदनांचा पाऊस पडला तरीही
तुझ्या गालावरची खळी
फुललेली च दिसते
खरच स्वप्नाली तू खूप छान हसतेस


रवि जाधव (११९२२)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: माझी स्वप्नपरी
« Reply #1 on: April 02, 2013, 11:14:49 AM »
चांगला प्रयत्न आहे! :) :) :)

Offline Ravi Jadhav

 • Newbie
 • *
 • Posts: 13
 • Gender: Male
 • dream of passion
Re: माझी स्वप्नपरी
« Reply #2 on: April 02, 2013, 11:17:00 AM »
thanxsss milind jiii