Author Topic: प्रेम अडवता येत नाही  (Read 1415 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
प्रेम अडवता येत नाही
« on: April 15, 2013, 12:38:29 AM »
प्रेम अडवता येत नाही

--------------------------------------

कोसळणाऱ्या पावसास जसं

अडवता येत नाही

उधाण आलेल्या सागरास

जसं थोपवता येत नाही

तसं मनात उमलणाऱ्या प्रेमास

कुणीही अडवू शकत नाही

फुलाचा गंध जसा

कुणी रोखू शकत नाही

कडाडणाऱ्या विजेस कुणी

मुठीत धरू शकत नाही

तसं मनात उमलणाऱ्या प्रेमास

कुणीही अडवू शकत नाही

कुणी आवडायला लागल्यावर

मनास लगाम घालता येत नाही

रात्र झाल्यावर जशी

पहाट झाल्याशिवाय रहात नाही

तसं मनात उमलणाऱ्या प्रेमास

कुणीही अडवू शकत नाही

एकदा प्रेमात पडलं की

मनास चैन पडत नाही

प्रेमाशिवाय एकही क्षण

मन जगू शकत नाही

खंर प्रेम मनात उमलल्यावर

त्या प्रेमाशिवाय कुणीही राहू शकत नाही .                                                              कवी : संजय एम निकुंभ , वसई

                                                           दि . १४ . ४ . १३ वेळ  : १२ . ३० रा .   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: प्रेम अडवता येत नाही
« Reply #1 on: April 15, 2013, 09:07:30 AM »
khup chan sanjayji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]