Author Topic: मनात प्रेम उमलू लागल्यावर ………  (Read 1617 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
मनात प्रेम उमलू लागल्यावर ………

 ------------------------------------------------

 मनात प्रेम उमलू लागल्यावर

 ओढ सुरु होते

 रात्री निजल्यावर

 स्वप्न सुरु होते

 कुठ्लाची क्षण असो

 झुरणे सुरु होते

 जवळ असो वा दूर

 मन बेचैन होते

 नकळत आठवणीत

 राहणे सुरु होते

 आठवणीच्या झुल्यावर

 पाहणे सुरु होते

 पापण्या मिटल्या तरी

 दिसणे सुरु होते

 एकांतातही प्रेमासोबत

 बोलणे सुरु होते

 सुख दु:खाचा लपंडाव

 खेळणे सुरु होते

 स्वतःला विसरून प्रेमासाठी

 जगणे सुरु होते

 मनात प्रेम उमलू लागल्यावर

 मन वेडे होते

 प्रेमाभोवतीच प्रत्येक क्षण

 मन फिरू लागते .

 कवी : संजय एम निकुंभ , वसई

 दि. १५ . ४ . १३ वेळ : ४ . ३० दु .

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Kay karnar sanjayji,
premat padla ki asach hota..;)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
thanx shrikant