Author Topic: असं वाटतं सखे ...  (Read 1344 times)

Offline देवेंद्र

  • Jr. Member
  • **
  • Posts: 90
असं वाटतं सखे ...
« on: April 19, 2013, 01:09:13 PM »
असं वाटतं सखे ...

काजवा होवून रात्री तुला झोपेत एकटक पहावं
पहाटे दवाचा  थेंब होवून तुझ्या ओठांवर हरवून जावं

  कोवळ्या उन्हाचा किरण होवून सकाळी तुला उठवावं
  रिमझिम पावसाची धार होवून तुला भिजवावं

वा-याची एक झुळूक होवून तुला स्पर्श करावा
गुलाबाचं एक फुल होऊन तुझ्या केसांमध्ये गुंतून रहावं

  मोग-याचा  गंध होऊन श्वासासवे तुझ्यात विरून जावं
  … तुला पाहताना, मी मलाही विसरून जावं


       - देवेंद्र

Marathi Kavita : मराठी कविता