Author Topic: सप्तमीचा चंद्र...  (Read 930 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
सप्तमीचा चंद्र...
« on: April 20, 2013, 04:34:22 AM »
सप्तमीचा चंद्र आज
मेघाआड लपला आहे
तुझ्या आठवणींचे दुःख
त्यालाही सतावित आहे ।

ढगाळलेले आभाळ ही
व्याकुळ झाले आहे
पावसांच्या सरीरूपे
मुग्ध अश्रूं गाळत आहे ।

गार वारा आषाढाचा
आज स्तब्ध झाला आहे
शोधासाठी तुझ्या तो
अंतराळात गेला आहे ।

आठवण तुझी श्वासांना
नेहेमीसारखी येत आहे
आज तो थबकून थबकून
तुझा शोध घेत आहे ।

निद्राही आज माझी
जागरूक राहिली आहे
स्वप्नांत तरी तूं दिसशील
म्हणून वाट पहात आहे  ।।
                              रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/04/love-poem_19.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 879
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
Re: सप्तमीचा चंद्र...
« Reply #1 on: April 20, 2013, 09:42:54 AM »
ढगाळलेले आभाळ ही
व्याकुळ झाले आहे
पावसांच्या सरीरूपे
मुग्ध अश्रूं गाळत आहे ।
 
chaan aahet oli....