Author Topic: माझा खेळ  (Read 1018 times)

Offline kaivalypethkar

  • Newbie
  • *
  • Posts: 23
माझा खेळ
« on: April 20, 2013, 04:49:37 PM »
चालताना तिचे ठसे
टिपण्याचा माझा खेळ
बोलताना शब्द तिचे
वेचण्याचा माझा खेळ

केसं तिचे वार्यासवे
उडताना डोलताना
वाहणारया वार्यातूनं
फिरण्याच्या माझा खेळ


वाटेवरी अंथरावी तिच्या
कधी जी जुई
काट्या न सवे खरे खोटे
बोलण्याचा माझा खेळ

काजळीचे डोळे तिचे
प्राण प्राण जपताना
डोळ्यातून तिच्या मला
शोधण्याचा माझा खेळ

तुझ्या प्रीति पाठी
धावे माज्या आसवांची सय
मुक्या मुक्या आसवांशी   
बोलण्याचा माझा खेळ

मला कळे वाट तुझी
गावाकडे येत नहीं
वेशिकडे डोळे लगे
माझा जुना जुना खेळ
« Last Edit: April 20, 2013, 06:26:08 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: माझा खेळ
« Reply #1 on: April 22, 2013, 11:13:05 AM »
chan