Author Topic: तीच येण  (Read 1629 times)

Offline Shona1109

  • Jr. Member
  • **
  • Posts: 64
तीच येण
« on: April 22, 2013, 03:28:48 PM »
शांत संध्याकाळी समुद्रकिनारी
तिची वाट बघत मी बसलो होतो
दूर देशावरून येणाऱ्या लाटेशी
एकटाच बोलत होतो
किनार्यावरच्या.......तिच्या प्रेमाची ओढ वाढतच होती
ओहटी नंतर येणारी भरती मोठी होती
माझी अवस्था काही वेगळी नव्हती
समुद्राची भरती माझ्या मनात कधीच आली होती
तिला भेटायला मन आतुर होत
ती आल्यावर येणाऱ्या वसंताच आगमन आताच जाणवत होत
नकळत तिचा स्पर्श झाला
अन अंगावर शहारयांचा पाउस पडला
तिच्या "ह्या " स्पर्शाने  मनपिसारा फुलला
गुलाबाचा गंध मग मी काट्याशिवाय घेतला
माझी मनीषा देवाने ओळखली होती
वाऱ्याच्या झुळूकेबरोबर ती आली होती
नजरेला नजर भिडली अन मन बेभान झालं
दोर तुटून उडणाऱ्या पतंगासारख स्वतंत्र झालं
तीच येण स्वाती नक्षत्रातल्या पावसा सारख असत
तिच्याबरोबरचा  प्रत्येक क्षण शिंपल्यात पडलेल्या थेंबासारखा अमुल्य असतो
« Last Edit: April 22, 2013, 04:01:47 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता