Author Topic: तूं जवळ होतीस तेव्हां ...  (Read 2700 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311

तूं जवळ होतीस तेव्हां
  तुझा विचार केला नाहीं
आतां मात्र तुझ्या वाचून
  दुसरा विचार सुचत नाहीं

तूं असतानां तुझ्या मस्तकी
  गजरा कधीं माळला नाहीं
तुझ्या साठी आतां परंतु
  अश्रूंची माळ चुकत नाहीं

तूं बरोबर होतीस तेव्हां
  दुःख मनास शिवले नाहीं
तुझ्या अभावी आता मात्र
  सुखाची भेट होत नाहीं

मनुष्य जवळ असताना
  त्याची किंमत कळत नाहीं
तो नसताना ते कळून
  काहीं उपयोग होत नाहीं

जीवनांतील हे सत्य
  कुणालाच कसे कळले नाहीं
तें कळले असते तर
  कुणीच दुःखी होणार नाहीं
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

http://www.kaviravi.com/2013/04/love-poem_22.html