Author Topic: मला आवडणाऱ्या तिला...  (Read 2449 times)

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
मला आवडणाऱ्या तिला...
« on: May 02, 2013, 11:51:23 PM »

दोघांचही नाव सारखच
वयातही आमच्या जास्त फरक नव्हता
सांगायची गोष्ट एवढीच की
मला आवडणाऱ्या तिला तो आवडत होता

हसू आल ना ! मलाही आल
ती सुद्धा हसली मला हे सांगताना
मधेच मग थांबली माझ्याकडे बघत
पहावल नाही तिला मला अस हसताना

काय गंमत आहे नाही
तुझ्याच नावाचा मला जोडीदार मिळाला
ती सांगतच राहिली भरभरून तेव्हा
मला माझ्या नावाचा मात्र तिटकारा आला

एका अर्थी हे बरच झाल
आपण नाही सांगितलं गुज मनातल
मिळाल की आता जे हवय ते तिला
अजून कशास द्यायचे सुख ... दुखातल

त्या भेटीत सांजभर मग ती
उगीच अश्रू ढाळीत होती
मलाच नव्हते कळत काही
कोण सल तिला सलत होती

खुश आहेस ना ! मी सहजच विचारलं
खाल मानेन ती हो म्हणाली
मग अचानक वळली अन जाताना बोलली
चल निघते मी, बघ खूप रात्र पण झाली

आता मात्र मला काही सुचेनास झाल
ती चालली ... मनास माझ्या पटतच नव्हत
मग ठरवलं सांगाव तिला सगळ
पकडला तिचा हात अन बोललो जे होत नव्हत
 
शांतपणे तिने ऐकून घेतलं सार
लागली नंतर हसायला माझ्याकडे पाहून
निर्धाराने मला बोलली मग शेवटी
कळत नाही तुला हेच कधी पासून

हसू आल ना ! मलाही आल
ती सुद्धा हसली मला हे सांगताना
मधेच मग थांबली माझ्याकडे बघत
पहावल नाही तिला मला अस हसताना

दोघांचही नाव सारखच
वयानही बहुधा सारखेच होतो
सांगायची गोष्ट एवढीच की
मला आवडणाऱ्या तिला मीच आवडत होतो

.... रुपेश सावंत

Marathi Kavita : मराठी कविता

मला आवडणाऱ्या तिला...
« on: May 02, 2013, 11:51:23 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मला आवडणाऱ्या तिला...
« Reply #1 on: May 03, 2013, 11:24:56 AM »
हसू आल ना !

मलाही आल!!!!!!! :) :) :)

फारच छान कविता आहे!!

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: मला आवडणाऱ्या तिला...
« Reply #2 on: May 03, 2013, 11:35:46 AM »
mastach...... :-X

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
Re: मला आवडणाऱ्या तिला...
« Reply #3 on: May 03, 2013, 05:45:47 PM »
hoy malahi khup aawadali mhanunch share keli tumchyashi... ;)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):