Author Topic: निद्रीत नेत्रीं माझ्या  (Read 987 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
निद्रीत नेत्रीं माझ्या
चोरून मूर्ती आली
अस्पष्ट रूपरेखा परि
तत्काळ ओळखिली
नेत्रांत चमक न्यारी
खेळते कुंतलाची
        अवखळ एक गालीं
स्मित गोड अधरी दिसतें
पुनवेचे स्मरण देते
ज्योत्स्ना जणुं तयाची
           त्याच्यात साठविली
स्पर्शांत तो निवारा
मयूराचा जणु पिसारा
गात्रांवरी तयाने
हूर हूर पेटविली
बघतांच मी सखीला
नेत्रांत धूंद चढली
होऊन अधीर उठता
           रात्रीत विलीन झाली
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

http://www.kaviravi.com/2013/05/love-poem_5.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: निद्रीत नेत्रीं माझ्या
« Reply #1 on: May 06, 2013, 11:03:26 AM »
Sadhanaji... Khup sundar kavita ahe,,

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: निद्रीत नेत्रीं माझ्या
« Reply #2 on: May 06, 2013, 10:24:30 PM »
khup chan... :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: निद्रीत नेत्रीं माझ्या
« Reply #3 on: May 07, 2013, 01:16:25 PM »
खूप छान!!!