Author Topic: गुलाबी पाकळ्या  (Read 2932 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
गुलाबी पाकळ्या
« on: May 09, 2013, 11:31:53 AM »
गुलाबी पाकळ्या

नाजूक गुलाबी पाकळ्यामधून,
हलकेच ओघळताना, मधाचा,
एक थेंब दिसला!
क्षणभर मज कळेना,
आधी मध प्राशन करू,
कि पाकळ्याशी खेळू!
क्षण ओझरला, ऋतू बदलला,
पाकळ्या साऱ्या कोमेजल्या!
स्तब्ध मी, मज काही सुचेना,
आर्त स्वर एक, मनी कुजबुजला,
क्षणात मज आठवला,
मी चाखलेला, तो थेंब मधाचा!
नयनी दाटला, ऋतू एक ओघळला,
अन पाकळ्या साऱ्या फुलल्या!
क्षणभर मज कळेना,
कसे थांबवू, त्या बदलत्या ऋतूंना,
कसे साठवू, साचवू त्या थेंबांना,
मनमंदिरातल्या तळ्यांत माझ्या!

मिलिंद कुंभारे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: गुलाबी पाकळ्या
« Reply #1 on: May 09, 2013, 07:05:00 PM »
Sundar bhavarth...

Re: गुलाबी पाकळ्या
« Reply #2 on: May 09, 2013, 11:50:45 PM »
mast

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: गुलाबी पाकळ्या
« Reply #3 on: May 10, 2013, 09:32:32 AM »
chaan...

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: गुलाबी पाकळ्या
« Reply #4 on: May 10, 2013, 11:20:37 AM »
प्रशांत, कौस्तुभ, Prajunkush.......

मनापासून आभार!
आणखी एक विनोदी कविता लिहिलिय…"कोमेजलेल्या पाकळ्या"!
जरूर वाचा, विनोदी कवितांमध्ये!!!! :) :) :)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: गुलाबी पाकळ्या
« Reply #5 on: July 14, 2013, 02:17:17 PM »
क्षणभर मज कळेना,
कसे थांबवू, त्या बदलत्या ऋतूंना,
कसे साठवू, साचवू त्या थेंबांना,
मनमंदिरातल्या तळ्यांत माझ्या :) :) :)मस्त !फारच छान  :)

Offline Pratej10

 • Jr. Member
 • **
 • Posts: 61
 • Gender: Female
Re: गुलाबी पाकळ्या
« Reply #6 on: July 15, 2013, 03:05:46 PM »
खूप छान  :) :) :) :)

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: गुलाबी पाकळ्या
« Reply #7 on: July 15, 2013, 07:02:29 PM »
 :) :)छान  :) :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: गुलाबी पाकळ्या
« Reply #8 on: July 16, 2013, 10:21:02 AM »
sweetsunita,
धन्यवाद
खूप मनापासून लिहिली होती हि कविता ….   :(
पण का कुणास ठाऊक जास्त प्रतिसादच मिळत नव्हता म्हणून दुसरी कविता लिहिली "कोमेजलेल्या पाकळ्या", जरूर वाचा …  :D

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: गुलाबी पाकळ्या
« Reply #9 on: July 16, 2013, 10:23:56 AM »

vijaya kelkar, Pratej.....धन्यवाद... :)

"कविता कशी लिहावी" हा general discussion मधला टोपीक जरूर वाचा आणि लयबद्ध कविता लिहायचा प्रयत्न करा …

thanks... :)