Author Topic: तु आहेस तरी कोण...  (Read 3715 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
तु आहेस तरी कोण...
« on: May 12, 2013, 11:00:53 PM »
कधी कधी असाच एकांतात
तुझी आठवण करत
तुझी कल्पना करत राहतो
कल्पनेच्या महासागरात असाच डुंबत राहतो
तरीही थांग लागत नाही की
तु आहेस तरी कोण...
असे वाटते तुझ्या खोल खोल डोळ्यांत
स्वतःला झोकून द्यावे
क्षणाभारसाठी सर्व विसरून ह्या
देहापासूनच वेगळे व्हावे
खुपदा प्रयत्न केला तरी
अजूनही कळत नाही की
तु आहेस तरी कोण...
आज पर्यंत कितीतरी जण
आयुष्यात आले आणि कितीतरी परत गेले
पण तु नसताना क्षणभरासाठीही
तुझी आठवण मनातून जात नाही
माझे तर सोड ह्या मनालाही उमगत नाही की
तु आहेस तरी कोण... 
चौर्याऐशी योनींतून मानव म्हणून जन्मलो
कुणास ठाऊक किती वेळा जगलो मेलो
हेही शोधायला असेल सोपे पण
सर्वथा कठीण वाटते जाणणे की
तु आहेस तरी कोण...
तु कधी स्वताकडे पाहा एकदा
म्हणजे तुला पटेल माझे म्हणणे
की एकमेकांवाचून अपूर्ण आहे आपले जगणे
साद घालतोय मी तुला आता तूच सांग मला की
तु आहेस तरी कोण...
तु आहेस तरी कोण...

...प्राजुन्कुश
...Prajunkush.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तु आहेस तरी कोण...
« Reply #1 on: May 13, 2013, 09:54:49 AM »
chan

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
Re: तु आहेस तरी कोण...
« Reply #2 on: May 13, 2013, 06:47:38 PM »
chaan aahe
sangel nakkich tula ki ti aahe tari kon

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: तु आहेस तरी कोण...
« Reply #3 on: May 14, 2013, 09:57:37 AM »
mast....

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: तु आहेस तरी कोण...
« Reply #4 on: May 14, 2013, 02:55:27 PM »
फारच छान !!!

ती आहे तरी कोण...

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: तु आहेस तरी कोण...
« Reply #5 on: May 15, 2013, 09:08:32 PM »
mast!

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: तु आहेस तरी कोण...
« Reply #6 on: May 20, 2013, 05:19:03 PM »
मला हि कविता विशेष आवडली .तत्त्वज्ञान आणि कविता एकत्र आले कि मला मजा येते .किंवा नशा येते म्हणू या .

माझे तर सोड ह्या मनालाही उमगत नाही की >>>> आपण आणि आपले मन वेगळे का असतो ?

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तु आहेस तरी कोण...
« Reply #7 on: July 30, 2013, 02:18:48 AM »
Dhanyavad VikrantJi..