Author Topic: कस कराव प्रेम तुझ्यावर हेच मला कळत नाही..  (Read 3194 times)

Offline avabhijeet

  • Newbie
  • *
  • Posts: 4
कळतंय म्हणाव  तर कळत नाही, वळतय म्हणव तर वळत  नाही,
कस कराव प्रेम तुझ्यावर हेच मला कळत नाही …. हेच मला कळत नाही…
दुसरीकडे काहीतरी असणार असा नेहमीच संशय घेणार,
अरे इथे एक मिळायची मारामार तिथे दुसरी कोण देणार…
बँक balance पाहून एक विचार मनात ठसतो,
आहे त्यात भागवून घ्या… आपल्याला choise  नसतो…
अप्सरांची स्वप्न पाहून वास्तव काही टळत नाही,
कस कराव प्रेम तुझ्यावर हेच मला कळत नाही …. हेच मला कळत नाही…
 
हिला वाटत मी हिच्यासाठी ताजमहाल सारखं काहीतरी कराव,
मजनु सारखं वाळवंटातून बिन चप्पलच फिरावं…
हवेतल्या हवेत हिची स्वप्न रंगवण काही थांबत नाही,
हाडाचा painter असून, मला सुद्धा ते जमत नाही….
म्हणजे, कॅनवास तयार, ब्रश तयार, पण रंग काही आम्हाला मिळत नहि…
कस कराव प्रेम तुझ्यावर हेच मला कळत नाही …. हेच मला कळत नाही…
 
पुनर्विचार करून मलाच आता निर्णय घ्यावा लागणार,
साखरपुड्याची अंगठी सुद्धा हि बघत नाही, ती पुढे काय साथ देणार…
प्रेमात ताकद असेल माझ्या तर एवढ तरी व्हायलाच पाहिजे,
सगळी बंधनं तोडून तिने इकडे यायलाच पाहिजे…….
निघाली निघाली निघाली …. पण उंबऱ्यापाशी जी गाडी आडते ती पुढे काही पळत नहि…
कस कराव प्रेम तुझ्यावर हेच मला कळत नाही …. हेच मला कळत नाही…
 
 
 
Author Unknown
« Last Edit: May 27, 2013, 07:36:36 AM by avabhijeet »

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):