Author Topic: कधी नाही तो वणवा आज भर पावसात भडकला.....  (Read 2047 times)

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
पहिल्या पावसाची पहिली सर काल रात्रीच  बरसून गेली
तुझ्या माझ्यातल्या प्रेमाला पुन्हा बहरून गेली
 
गुंग होतो प्रणयात तू न मी
घट्ट मिठीत तुझ्या घ्यायची  होती  मजला  ऊब
 
ओल्या मानेवर जाणवत होती तुझ्या श्वासांची तळमळ
चिंब पाठीवर केसांची नुसतीच सळसळ
 
मिटलेल्या ओठांच्या कळीला हलकेच तू फुलवलेला
थरथरत्या ओठांचा  रस पिण्यास होतास  तू आसुसलेला
 
अंगावरचे थेंब ओठांनी वेचताना हरपली तुझी भान 
खूप दिवसांची तृषा भागली याची  होती मला जाण
 
गरम श्वासांची होत होती देवाण घेवाण
भिजलेल्या अंगावर शहाऱ्यांची पसरली  गुलाबी शाल 

अंगभर भिनत होतो एकमेकांत
उरली नव्हती  कोणतीच वहिवाट 

तुझ्या माझ्या मिलनाला अंत आता नव्हता राहिला
कारण  कधी नाही तो वणवा आज भर पावसात भडकला ....shonaMarathi Kavita : मराठी कविता


Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
छान …. क्या बात ……  :) :) :)

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
shona...hahahahahahaha.....chaan