Author Topic: मन वेडे.....  (Read 1875 times)

Offline Shona1109

  • Jr. Member
  • **
  • Posts: 64
मन वेडे.....
« on: May 29, 2013, 04:08:21 PM »
मन वेडे.....मन वेडे.....
फुलपाखरांचे पंख लावूनी आकाशी उंच उडे
वाऱ्याच्या झोक्यासोबत हलकेच ते घेई झोके
ढगांच्या कुशीत लपण्यात गमंत फार वाटे
 
मन वेडे.....मन वेडे.....
सोनेरी किरणांचे घाली झिलमील  झगे
नटून - थटून मिरवायचे ते जग सारे
मोगऱ्याच्या अत्तराचे गालावर खुलवी बोट ओले
 
मन वेडे.....मन वेडे.....
सागराच्या लाटांसोबत गायचे ते गाणे
क्षितिजाच्या पल्याडी कल्पनांचे घर छोटे
रंगांची ओंझळ गगनी मुक्त उधळे
 
मन वेडे.....मन वेडे....
रातीला चंद्र - चांदण्यांशी मैफिल त्याची सजे
स्वप्नांच्या नगरीचे दरवाजे झाले खुले
रातराणीच पांघरून घेऊन ते मस्त झोपे
 
मन वेडे.....मन वेडे.....
शेवटी तुझ्यातच ते रमे
तू असताना तुझ्या भोवतीच असायचे त्याचे फेरे
तू नाहीयेस तर तुझ्या आठवणींचे गिरवीत असते एकटे धडे..shona
 


Marathi Kavita : मराठी कविता