Author Topic: जीवनाच्या धूंद स्मृति  (Read 1014 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
जीवनाच्या धूंद स्मृति
क्षणांत मनीं उभरतात
अन हृदयांतील मंद मंद
श्वास क्षणभर अडखळतात

ठेवले तुला जतन करोनि
मम पापण्यांच्या पंखांत
कोरून तशीच ठेविली
तव रूपरेखा हृदयांत

सदैव तूं वास करतो
हृदयाच्या स्पंदनांत
नेत्रांतील मूर्ती तुझी
हळूच येते स्वप्नांत

तुला पाहते सदैव मी
जागेपणी वा स्वप्नांत
आधारावर त्याच एका
जीवन जगते एकांतात
रविंद्रबेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/love-poems.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 879
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
Re: जीवनाच्या धूंद स्मृति
« Reply #1 on: June 04, 2013, 11:28:05 AM »
khup chaan.....