Author Topic: तुझ्यामुळेच कळली प्रीत  (Read 1762 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
तुझ्यामुळेच कळली प्रीत
----------------------------------
तू नसूनही आयुष्यात
तुझ्या गंधान
रोम रोम भारलेल असतं
प्रत्येक क्षणात माझं मन
तुझ्या प्रीत गंधान
मोहरलेल असतं
तू वावरत असतोस माझ्यात
अगदी जागे झाल्यापासून
निद्रिस्त होईपर्यंत
खरं म्हणजे अजूनही
विश्वास बसत नाही माझ्यावर
हे असंही घडू शकत आयुष्यात
पण तू आलासच असा
एक वादळ होऊन प्रेमाचं
कि जे मी कधी स्वप्नातही
विचार करू  शकत नव्हते
कधी वाटलंच नव्हत असंही प्रेम
कुणी करू शकत कुणावर
निष्पाप अन निरागस
कुठलीही अपेक्षा न  बाळगणार
म्हणून अजूनही हे स्वप्नच वाटतं
पण तुझ्यामुळेच कळला मला
खऱ्या प्रेमाचा अर्थ
अन प्रेमात बेधुंद जगणं
काय असतं ते हि
म्हणून तू नसूनही आयुष्यात
तूच जगणं झालायं
तूच जगणं झालायं .

                                   कवी : संजय एम निकुंभ , वसई
                                   दि . ४ . ६ . १३  वेळ : ५ . ३० स.