Author Topic: असंही प्रेम  (Read 2173 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
असंही प्रेम
« on: June 04, 2013, 06:16:52 AM »
असंही प्रेम
-----------------------------------
माझ्या एका शब्दावर
तू तुझं काळीज
काढून देशील माझ्या तळहातावर
कळत नाही मला
इतकं कसं प्रेम कुणी
करू शकत कुणावर
पण तू अपवाद आहेस
या स्वार्थी जगात कुणी कुणाच नसतांना
माझ्यावर जीव ओवाळून टाकणारा
माझा विश्वास आहे
तुझ्या प्रत्येक भावनेवर
पण पुन्हा पुन्हा मनात
एक प्रश्न सतावत रहातो मला
मी तुझी कधीच होऊ शकणार नाही तरी
इतका कसा प्रेम करतोस तू माझ्यावर
इतका कसा प्रेम करतोस तू माझ्यावर .

                                                    कवी : संजय एम निकुंभ , वसई
                                                     दि . ४ . ६ . १३  वेळ : ६ . ०० स. 

Marathi Kavita : मराठी कविता