Author Topic: दूरवर कुठेतरी …………  (Read 1747 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
दूरवर कुठेतरी …………
« on: June 04, 2013, 06:45:18 AM »
दूरवर कुठेतरी …………
------------------------------------
दूरवर कुठेतरी घेऊन जा मला
या जगापासून
नाही राहू शकत दूर
मी तुझ्यापासून
ने अशा जगात
जे आपल्यासाठी नवखं असेल
तिथे कुणीही आपल्याला
जराही ओळखत नसेल
तिथे कुठलेही बंधन
प्रीतीवर नसेल
फक्त प्रेमासाठीच ते जग
वसलेलं असेल
जिथे जीव घुसमटणार नाही
हात तुझा हाती घेतांना
साकार करू शकेल मी
मुक्तपणे मनातल्या स्वप्नांना
असं जग असेल कां रे
या पृथ्वी तलावर
घेऊन जा मला
विश्वास आहे तुझ्या प्रेमावर
घेऊन जा मला
विश्वास आहे तुझ्या प्रेमावर .

                                                 कवी : संजय एम निकुंभ ,वसई
                                                  दि. ४ . ६ . १३  वेळ : ६ .३० स.   

[/size][/color]

Marathi Kavita : मराठी कविता